अलंग गड alanggad AlangFort amk
अलंगगड सह्याद्रीच्या उपरांगामधील कळसूबाईची उपरांग ही नैसर्गिक रित्या अतिशय बेलाग आहे. या रांगेतील किल्ले बलदंड असून त्यांना निसर्गाचाही वरदहस्त लाभलेला आहे. या रांगेमधे आड, औढा, पट्टा, बितन, अलंग, मदन, आणि कुलंग असे एका चढ एक किल्ले आहेत. प्रवरा नदीच्या खो-यात आहे किल्ले अलंगगड. किल्लेप्रेमीचे आकर्षण ठरलेले अलंग, कुलंग आणि मदन हे त्रिकुट याच खोप्यात आहे. येथे कळसूबाई रांग नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर उभी आहे. नाशिककडे म्हणजे उत्तर बाजूला इगतपूरी तालूका असून दक्षिणबाजूला अहमदनगर मधील अकोले तालुका आहे. अकोले तालुक्यामधील भंडारदराचे धरण प्रसिध्द आहे. रंधा धबधबा, भंडारदरा तसेच अमृतेश्वर मंदिर पहाण्यासाठी शेकडो पर्यटक या परिसरामध्ये भेट देत असतात. यामधील मोजकेच पर्यटक या भागातील दुर्गम किल्ल्यांना भेटी देतात. भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या मागे म्हणजे पश्चिमेला घाटघर नावाचे लहानसे गाव आहे. या गावापर्यंत गाडीरस्ता गेलेला आहे. घाटघर हे गाव अलंगगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे.
तीन चारशे मिटर उंचीचे कातळमाथे असणारे अलंग, कुलंग आणि मदनगडाचे दर्शन उरात धडकी भरवणारे आहेत. हा प्रदेश दुर्गम आहे. त्यामुळे घाटघर मधून वाटाड्या घेणे सोईस्कर ठरते. तसेच सोबतच्या पाणपिशव्याही भरुन घ्याव्या लागतात. घाटघरपासून तीनएक कि.मी चालत गेल्यावर आपण अलंगगडावरून उतरणार्या एका दांडाजवळ पोहोचतो. तिव्र चढाच्या या दांडावरुन अलंगगडाच्या पश्चिम अंगाच्या पदरामधे पोहोचेपर्यंत चांगलीच दमछाक होते. या पदरात जंगल आहे. येथे झाडीबरोबर झुडुपेही खूप आहेत. झाडीच्या पट्टयामागे अलंगचा कातळमाथा दिसतो. या कातळमाथ्याला एक लहानसा सुळका आहे. त्याला लिंगी म्हणतात. अलंगच्या कातळमाथ्यावरुन पावसाळ्यात पाण्याचे ओहोळ खाली वहातात त्याच्या खुणा दिसतात. लिंगीपासून डावीकडे तिसर्या ओहोळा जवळ गडावर जाणारा मार्ग आहे. झाडीत शिरुन तिसर्या ओहोळाच्या पायथ्याशी पोहोचावे लागते. येथून कातळ चढून आपण अलंगच्या कड्याला भिडतो. येथे असलेल्या काही पायर्या तुटल्यामुळे हा भाग काहीसा अवघड झालेला आहे. येथे दोराचा वापर आवश्यक आहे. बुजलेल्या दरवाजाच्या बाजूने आपण गडप्रवेश करतो. येथून किल्ल्याच्या उत्तर बाजूला चालत जावे लागते. हा मार्ग कातळ कड्याच्या मध्यातून जात असल्यामुळे डावीकडे दरी आणि उजवीकडे कातळमाथा असतो.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे .
घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे. कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष व एक छोटेसे मंदिर आहे. पूर्वेला कळसूबाई, औंढचा किल्ला, पट्टागड, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.
घाटघर मार्गे: किल्ल्यावर जाण्यासाठी ही दुसरी वाट आहे. पहिली आंबेवाडी मार्गे आहे. घोटी – भंडारदरा मार्गे घाटघरला जावे. तेथून अडीच तासात किल्ल्याच्या तिसर्यात घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहचतो. या बेचक्यातून थोडे वर गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण करावे लागले. पुढे थोडी सपाटी पार केल्यानंतर डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० – १५ मि. आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. खिंडीतून डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर ८० – ९० फुटाचा तुटलेला एक कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. मात्र, प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करु नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.
गाईड व राहण्याच्या सोयीसाठी संपर्क : 8390-607-203
Alang
Distance from Akola: 55.4 km
The Kalsubai Upang in the Alang garh Sahyadri subway is naturally quite unique. The forts in this range are strong and they have the richness of nature. The range comprises one of the forts of Aad, Oudha, Patta, Bitan, Alang, Madan, and Kulang. The fort of Alang gad lies in the valley of the Pravara river. The trio is Alang, Kulang and Madan which is the attraction of the fortress. Here, the Kalsubai Range stands at the border of the two districts of Nashik and Ahmadnagar. Nashik has Igatpuri taluka on the north side and Akole taluka in Ahmednagar on the south. The dam is famous for storage in Akole taluka. Hundreds of tourists visit the area to see the Randha Falls, Bhandardara and Amritswar temples. Only a handful of tourists visit the remote forts in this area. Behind the reservoir of the Bhandardara dam is a small village called Ghatghar in the west. There is a train going to this village. The Ghatghar is situated at the foot of the village Alang gad.
The views of Alang, Kulang and Madangada, which are three to four meters high, are intimidating. This region is remote. Therefore, it is convenient to get peas from the pier. It also has to be filled with adjoining water bodies. Walking about three kilometers from the ghat, we reach a steep slope. From this steep incline, it is well worth it to reach the footpath of the western part of Alanggad. There is a jungle in this position. Shrubs are also abundant here. Alang with a strip of bush is seen behind the tree trunk. There is a small cone on this cloth. It’s called Lingi. In the rainy season, the water flows down the slopes of Alang. There is a road leading from the penis to the left near the third canal. One has to enter the tree and reach the base of the third canal. From here, we climb the slopes and rush to the saddle. This section is a bit difficult due to some of the steps here. Here the use of rope is required. We enter through the side of a burning door. From here one has to walk on the north side of the fort. This route passes through the center of the sloping saddle, leaving the valley on the left and the slope on the right.
This fort is one of the most difficult fort in Akole taluka of Ahmednagar district .This area is very troublesome due to the dense forest and sparse population. This fort is neglected due to the difficult part of the fort, the heavy rainfall. Alang, Madan and Kulang, which are in the line of Kalsubai, are notable. The head of the fort is a vast plateau. There are two caves to stay in the fort. There are 11 water tanks. On the fort there are some ruins of the building and a small temple. To the east you can see Kalsubai, Fort of Aundh, Pattagad, Bitnagad, Harihar, Trimbakgarh, Anjeneri on the north, and Harishchandragad, Ajobagad, Khuta Sulka, Ratnagad, Katrabai hill on the south. It takes 4 hours to turn the fort’s head.
Via Ghatghar: This is another way to get to the fort. The first one is via Ambawadi. One should reach Ghatghar via Ghatti Bhandardara. From there, within an hour and a half, it reaches the wooden barge housed in the third floor of the fort. Going a little higher than this sale, it had to be easy rock climbing. After crossing it slightly flat, take the left path leading to the left. 10-15 minutes We reach the cave on the fort. As you pass through the window on the left, there are steps. As you climb these steps, you need a broken edge of 80-90 feet. The staircase can be accessed at the fort using propaganda material. However, you should not dare go this route unless you are aware of the technique of climbing. It takes 6 hours to reach the fort via this route.
Guides and Accommodations Contact: 8390-607-203