आढळा धरण Adhala Dam
आढळा धरण प्रकल्प देवठाण ता.अकोले जि.अहमदनगर मध्ये आहे.आढळा धरण हे समुद्रसपाटीपासून ६४२ मी उंचीवर आहे.तसेच ह्या धरणाच्या भिंतीची उंची ४० मी आहे.भिंतीची लांबी ६२३ मी आहे.धरणाच्या सांडव्याची लांबी१४३ मी आहे.तसेच पाणी साठवण क्षमता १०६० दसलक्ष इतकी आहे.तसेच पाणलोट क्षेत्र १७७.१० चौरस किलो मीटर असून ह्या धरणाचे दोन कालवे काढण्यात आले आहेत.त्यांना डावा कालवा व उजवा कालवा असे म्हणतात.डाव्या कालव्याची लांबी ८.८० किमी आहे.याची वहन क्षमता ४२ क्युसेक्स आहे.ह्या कालव्यामुले १४९२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणलेले आहे.तसेच उजव्या कालव्याची लांबी ११.८० असून वहन क्षमता ६८ क्युसेक्स आहे.त्यामुळे २४२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. ह्या धरणामुळे १४ गावांना पाणीपुरवठा होतो.त्यामध्ये अकोले तालुक्यातील ६ गावे,संगमनेर तालुक्यातील ६ गावे,सिन्नर तालुक्यातील २ गावे यांना सिंचनासाठी पाणीपुरवठा होतो.ह्या धरणावर जलशुधीकरण प्रकल्प उभारलेला आहे.ह्या प्रकल्पामुळे ५ गावांना शुद्ध पाणीपुरवठा केला जातो.
( माहिती सौजन्य: श्री.अनिल काकड, देवठाण )
गाईड संपर्क : 8390-607-203/ 9665-745-992