गाईड संपर्क: 8390-607-203 / 9665-745-992

इंद्रवज्र हरिश्चंद्रगड Endravajra, Harichandr Gad

Endravajra

अकोल्यापासून चे अंतर:

अदभुत अविष्कार : इंद्रवज्र

इंद्रवज्र हा एक अदभुत चमत्कार आहे निसर्गातला. पावसाळ्याच्या सुरूवातीला ज्यावेळी आपण उंचावर असू आणि ढग खालती असतील अशा वेळी ते दिसण्याची शक्यता असते. (शंभरात एकदा) त्यावेळी आपल्याला पूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्य दिसते. आणि विशेष म्हणजे ढगांवर आपली सावली आणि त्याभोवती इंद्रवज्र असा अद्भूत प्रकार असतो.
मला आता नक्की आठवत नाही पण बहुदा इंग्लिश कर्नल स्पाईक्स  याने ते हरिश्चन्द्रगडावरील कोकणकड्यावरुन पाहिल्याची नोंद केली आहे. गोनीदांनीही त्याचे वर्णन केले आहे.

इंद्रधनुष्य / इंद्रवज्र कसे निर्माण होते ?
इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट अर्धगोलाकार/धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. खरे म्हणजे प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल ( इन्द्रवज्रच) असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि  किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. ( आजपर्यंत जगात असे काही असते हे पण माहित नव्हते. )

गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *