कठे यात्रा कौठवाडी कठ्याची यात्रा Kathe Yatra
कठ्याची यात्रा याच परंपरेचा भाग …. . डोक्यावर पेटलेले कठे… त्यातून उसळणा-या तप्त ज्वाला… शरीरावर ओघळणारे उकळत तेल …मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद… दैवताच्या नावाचा जयघोष… संबळ, धोदाणा-पिपाणी, डफ, तशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरु असलेला गजर आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने ‘हाईऽऽऽ हाईऽऽऽ’ असं लयबद्ध चीत्कार करत लोक बिरोबाचा गजर करतात… अक्षय तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी येथे बिरोबाची मोठी यात्रा भरते.
नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील कौठवाडीया गावात ही यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली घागर. कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उपडा करून ठेवतात. खैर, जांभूळ, साग अशा ढणढणत्या पेटणाऱ्या झाडांची लाकड या घागरीत उभी भरतात. त्यात कापूर, कापूस टाकतात. बाहेरच्या बाजूने त्याला सजवले जाते. या यात्रेचे वैशिट्य म्हणजे हेच पेटलेले कठे ( घागर ) डोक्यावर घेवून धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदीराला फेऱ्या मारतात. प्रत्येक फेरीगणिक किलो-किलो तेल या ढणढणत्या कठ्यांमध्ये भाविक ओतत असतात. तापलेले हे तेल कठ्यांमधून खाली भक्तांच्या उघड्या अंगावर ओघळत. मात्र लालबुंद होणाऱ्या कठ्यातील निखाऱ्याने अथवा तप्त तेलाने एखाद्या भाविकालाही इजा होत नाही.
नवसपूर्ती झाल्यानंतर श्रद्धाळू आदिवासी भाविक कठा घेवून येतात. दरवर्षी यात्रेत ४० ते ५० कठे असतात. एकाचवेळी ते पेटवले जातात. परिसरातले भक्तगण ज्यावेळी हे कठे डोक्यावर घेवून मिरवतात. त्यावेळी रात्रीच्या काळोखात एक अद्भूत दृश्य दिसू लागते. कठ्याची ही परंपरा नेमकी केव्हा आणि कशी सुरू झाली, याबद्दल कुणालाही सांगता येत नाही. याला श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा मात्र पूर्वापार चालत आलेली ही परंपरा या आदिवासी बांधवांनी आजही अखंडीत ठेवली आहे.
यावर्षी ह्या वर्षी मात्र सर्वाना आग्रहाचे निमंत्रण सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत राहणारा आदिवासी समाजाचे… कला तर मग अकोलेमाझा टिम सोबत एक आगळी वेगळी यात्रा पाहण्यास … नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील कौठवाडीया गावात …
गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992