गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

कलाड गड kladgad

kaladgad
अकोल्यापासून चे अंतर : 47.9 km.

अकोले हा तालूका अहमदनगर जिल्हामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्यरांगेला लगटून असलेला अकोला तालुका डोंगदर्‍यामुळे निसर्ग संपन्न आहे. या डोंगर दर्‍यामधे अनेक दुर्गम दुर्ग असे गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. याच दुर्गाच्या साखळीमध्ये साधल्या घाटाच्या माथ्यावर कालाडगड नावाचा दुर्लक्षीत दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या खोर्‍यावर आपली करडी नजर ठेवणार कलाडगड स.स.११०० मी. उंच आहे.
पहाण्याची ठिकाणे :
गडाचा आकार  पुर्व-पश्चिम असा पसरलेला आहे. पुर्वेकडील भागात कातळ गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. भैरोबाला वंदन करुन गडफेरीला निघावे. डावीकडे कडा व उजवीकडे माथा ठेवून गडाच्या पश्चिम अंगाला जाता येते. डावीकडील कड्यावर तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे. गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेष दिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरुन हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधल्या घाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर, आजोबाचा भव्य डोंगर, कुमशेतची लिंगी, घनचक्करचे पठार, घनचक्कर भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. या डोंगराच्या सौंदर्याबरोबरच त्याचे रौद्रत्वही मनाला मोहवून टाकते.
पाचनई हे गाव हरिश्चंद्रगडाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे. येथून तास दीडतासामध्ये चालत कालडगडाच्या पायथ्याला आपण पोहोचतो. कलाडगडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. कलाडगडाच्या पायथ्यापासून जवळ एक लहानशी वस्ती आहे. तेथून पुढे अर्ध्यातासावर पेठेची वाडी म्हणून लहानसे गाव आहे.कलाडगडाचा डोंगर एकांड्या डोंगर आहे. मुळानदी आणि हरिश्चंद्रगडावरुन येणार्‍या मंगळगंगा या नद्याच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पुर्व अंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसे कुंड आहे. उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडा जाणवतो.उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडा जाणवतो. गडावर जाणारी वाट बर्‍यापैकी मळलेली आहे. गडवरच्या भैरोबाला नमन करण्यासाठी स्थानिक गावकर्‍यांची गडावर अधून मधून हजेरी असते. घसार्‍याची वाट असल्याने काहीशी काळजी घेतच चढावे लागते. या वाटेवर काही कातळात कोरलेल्या खोबण्याही आहेत. काही पायर्‍या चढून आपण गडामधे प्रवेश करतो.

गाईड व संपर्क : 8390-607-203 

Kaladgad

Akole is a taluka in Ahmednagar district. Akola taluka, surrounded by Sahyadri chief, in the western part of Ahmednagar district, is rich in nature. There are many remote forts located in this hill valley. At the top of the Ghat in this chain of fort stands a neglected fort called Kaladgad. The Kaladgad sea is about 1100 meters high, keeping its curb over the valley of the Mula river.

Places to visit:

The fort is spread east-west. In the eastern part is a sloping cave. The cave is in Bhairoba. Worship Bhairoba and leave for Gadfari. One can go to the west side of the fort with the left edge and the head on the right. On the left is the embankment. There are potable water tanks along the way. The west side of the fort has a thumb-like cone. On the fort are some of the earliest remnants of darkness. From the top of Kaladgad, Harishchandragad, Malashej Ghat, Bhairavgarh of Moroshi, Nana’s thumb, Nakata hill near Sadhli Ghat, Kumbada hill, grand hill of Kumbasat, Lingi of Kumchatkar plateau, Ghanchakkar Bhairagadhar and Khashakhar Bhashagarh, Kundhakgarh, Kumbhat. Along with the beauty of this mountain, its charm also captivates the mind.

Pachanai is situated at the foot of the hill of Harishchandragad. From here, we reach the footpath of the Kaldgadh, an hour and a half drive. There is a road to the fort from the east of Kaladgad. There is a small settlement near the base of the kalagadi. From there, on the other half, there is a small village called Peth’s Wadi. Kaladgad stands on the banks of the river Mangalaganga, coming from Mulandi and Harishchandragad. There is no other way than the old limb. At the base of the fort there is a small pool of water. In the summer, however, the water shortage is felt. The road to the fort is mostly muddy. Local villagers are occasionally present on the fort to bow to the Bhairobas of the fort. There is a need to worry about getting depressed. There are also some carved carvings on the road. After a few steps we enter the fort.

Guide & Contact: 8390-607-203

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *