गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

कळसूबाई शिखर Kalsubai

kalsubai
अकोल्यापासून चे अंतर :41.7 km

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे.
कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६  मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे पाहाता येतात.
इतिहास : कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय.
पहाण्याची ठिकाणे : कळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नविन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे. पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत, ती कळसूबाईची पावले आहेत अशी श्रध्दा आहे. शेवटच्या शिडीच्या खाली विहिर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारण ३ माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे. येथून समोरच खाली भंडारदयाचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.

पोहोचण्याच्या वाटा : या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदर्‍यापासून ‘बारी’ हे गाव अवघ्या ६ कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदर्‍याला जाणार्‍या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात.वाटेत तीन ठिकाणी आता लोखंडी शिडया बसविलेल्या आहेत. गावातच सामान ठेवून ५ ते ६ तासात शिखरावर जाऊन येता येते. गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा ओढा ओलांडून झाल्यावर थोडयाच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत घेऊन जाते.
स्वत:चे वाहन असल्यास मुंबई – कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी – सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरुन भंडारदर्‍याला जातांना, भंडारदर्‍याच्या अलिकडे ६ कि.मी अंतरावर ‘बारी’ हे गाव आहे.

राहाण्याची सोय : येथे शिखरावर रहाण्याची सोय नाही. शिखरा खालील शेडमध्ये किंवा भंडारदर्‍याला राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :बारी गावात/ भंडारदर्‍याला जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय : शिखरावर जाताना शेवटच्या टप्प्यावर शिडीच्या अगोदर एक विहीर आहे. वाटेत पाणी मिळत नसल्याने बारी गावातच पाणी भरून घ्यावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : बारी गावातून ३ तास लागतात.

Kalsubai is the highest peak in Maharashtra.

The height of the Kalsubai peak is about 1646 meter above sea level, while its height is approximately 900 meter from the village of Bari in the foothills. Up to half the height of this, the villagers have cultivated the steps. There are ladders on difficult slopes. Therefore, it is easy to reach the peak of Kalsubai in 3 to 4 hours. Bhandardara dam is about 6 km from here. There you can stay for 2 days and visit places like Kalsubai, Randha Falls, Kokanakada etc.

History:  The history of Kalsubai is a legend. In ancient times there was a spider girl named Kalsu. She was working at Patil’s house. Before she got to work, she had promised Patil that I would do other things besides littering and rubbing pots. Once a large number of guests came to Patil’s house, Patal put the pot on the pot, so that the screaming cats would go up the hill. That is the hill of Kalsubai.

Places to visit: The first phase of the new temple of Kalsubai starts with the start of the climb to Mount Kalsubai. This temple is built to facilitate those who cannot reach the summit. After passing the second ladder, two steps are engraved in the slit, which is believed to be the steps of the Kalsubai. At the bottom of the last ladder is a sink and a sheet shed on the side. At the summit is a small temple of Kalsubai. There is only enough room for around 3 people in the temple. From here downwards, the abutting reservoir of the reservoir draws attention. From this summit, the hill ranges of Rameses, Achala, Ahivant, Saptashung, Markanda, Dhodap, Ravalaya Javalya, Kolder are visible to the north. To the east, Aundh, Vishramgarh, Alang, Madan, Kulang, Matheran, Harishchandragad catch the attention.

Outreach:    The main way to reach this peak is through Bari village. The ‘Bari’ village is just 6 km from the reservoir. If you want to go to Bari village, you should reach Igatpuri on Mumbai-Nashik route. The ST going from Igatpuri to Bhandardari should come to Bari or village. It takes 3 hours to reach the summit from here. Iron ladders are now installed in three places in the Wat. You can leave the goods in the village and reach the summit in 5 to 6 hours. After leaving the village, a stream begins. After crossing this stream, a temple is located within a short distance. The path leading to the back of this temple leads directly to the summit.

If you own a vehicle you should reach Mumbai via Kasara. On the Ghoti-Sinnar route, there is a Bhandardara Fata. From this gate there is a ‘Bari’ village at a distance of 6 km from the Bhandardara.

Accommodation facilities:

It is not easy to stay at the peak here. The shed can be located in the shed below the peak or in the reservoir.

Dining facilities:

Bari village /bhandardara Villge storekeeper provides dining facilities.

Water Facility:

Going up the stairs, there is a well before the ladder at the last stage. Since there is no water on the way, the village should be filled with water.

Time to go:  It takes 3 hours from Bari village.

Guides and Accommodations Contact: 8390607203

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *