कात्राबाई खिंड katrabai khind

अकोल्यापासून चे अंतर : 45.7 km.
रतनगडला गेले की कात्राबाईची खिंड चढण्याचा मोह कोणाला होत नाही असं अजून तरी झालं नाही. रतनगडाच्या दक्षिण बाजूने बघितलं की समोरील करवतीच्या पात्यासारखे कातरलेली डोंगररांग म्हणजे कात्राबाईची डोंगर रांग होय. सात डोंगरांची करवतीच्या पात्याप्रमाणे तयार झाले आहे,कात्राबाई चे सौदर्य खरं तर पावसाळ्यात व हिवाळ्यात पहायला खूप छान वाटते.धुक्याने अंथरलेल्या ढगांच्या अच्छादनात यांचं रूप बघण्याची देहभान विसर पडायला भाग पाडते. कात्राबाई ते हरीचंद्र गड कुमशेत मार्गाने करता येतो, मात्र गाईड असल्या शिवाय या मार्गाने जाऊ नये हे ही तितकंच महत्वाचं. कात्राबाई चा डोंगर चढवून वर गेल्यावर कात्राबाई चे मंदिर लागते,मंदिरात चे दर्शन घेऊन पुढे गेले की रतनगडाचा कडेलोट बघता क्षणी कितीही धीट असला तरी हृदयाची धडधड वाढल्याशिवाय राहत नाही, बाजूला दिसतो खुंटा व समोर सह्याद्रीची अखंड रांग, पूर्वेच्या बाजूनी बघितलं तर भांडारदरा धरणाचे जलाशय बघणाऱ्याचे डोळे दिपवून टाखतो.अशी ही निसर्गाची किमया अकोले तालुक्यातील आश्चर्यला अजून ही एक भर कात्राबाई चा ट्रेक हा अविस्मरणीय ठरतो हे नक्कीच.
गाईड व संपर्क : 8390-607-203