कोतुळेश्वर कोतूळ Kotuleshwar Kotul
अकोल्यापासून चे अंतर : १९.२ कि.मी.
श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान हे कोतूळ गावाचे ग्रामदैवत आहे. अकोले शहरापासून १९ कि.मी. अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात, वनराईत वसलेले आणि ऐतिहासिक व पौराणिक परंपरा असेलेले हे एक देवस्थान आहे.
व्यास लिखित महाभारतातील “जैमिनी अश्वमेध” या ग्रंथात कोतुळेश्वर तथा कुन्तलेश्वर देवस्थानाचा उल्लेख आढळतो. भागवत भक्त चंद्र्हास्य या दानशूर राजाची कोतूल किंवा कुंतलपूर नगरी पुढे शब्द अपभ्रंशाने कोतूळ तथा कोतुळेश्वर या नावाने ओळखली जाऊ लागली. येथेच पांडवांचा विश्वविजयी अश्व अडविला गेल्याची कथा आहे. ऐतिहासिक काळात पेशव्यांच्या सेवेत असणा-या साडेतीन शहाण्यांपैकी एक विठ्ठल सुंदर परशुरामी याच गावातले.
महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. तीन ते चार लाख भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विविध धार्मिक विधी, उत्सव, हरिनाम सप्ताह असे उपक्रम दरवर्षी देवस्थान कमिटीद्वारे आयोजित केले जातात.
गाईड संपर्क : 8390-607-203
Thanks, great article.
Great article…
कोतुळ
कोतुळ हे गाव अहमदनगर जिल्हात अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. ह्या गावचे पूर्वीचे नाव कुंतलपूर होते, जी चंद्रहास राजाची राजधानी होती.येथे कोतुळेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे.
श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान हे कोतूळ गावाचे ग्रामदैवत आहे. अकोले शहरापासून १९ कि.मी. अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात, वनराईत वसलेले आणि ऐतिहासिक व पौराणिक परंपरा असेलेले हे एक देवस्थान आहे.
व्यास लिखित महाभारतातील “जैमिनी अश्वमेध” या ग्रंथात कोतुळेश्वर तथा कुन्तलेश्वर देवस्थानाचा उल्लेख आढळतो. भागवत भक्त चंद्र्हास्य या दानशूर राजाची कोतूल किंवा कुंतलपूर नगरी पुढे शब्द अपभ्रंशाने कोतूळ तथा कोतुळेश्वर या नावाने ओळखली जाऊ लागली. येथेच पांडवांचा विश्वविजयी अश्व अडविला गेल्याची कथा आहे. ऐतिहासिक काळात पेशव्यांच्या सेवेत असणा-या साडेतीन शहाण्यांपैकी एक विठ्ठल सुंदर परशुरामी याच गावातले.
महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. तीन ते चार लाख भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विविध धार्मिक विधी, उत्सव, हरिनाम सप्ताह असे उपक्रम दरवर्षी देवस्थान कमिटीद्वारे आयोजित केले जातात.
अकोले तालुक्यातील कोतूळ येथे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी लवणस्तंभाची भौगोलिक रचना दिसून येते. एका ठिकाणी छोटीशी गुहा बनून तिच्यात लवणस्तंभ तयार झालेले दिसले… स्थानिक लोक याला लवणस्तंभ म्हणत असले तरी भूगर्भात पाण्याच्या संचयन कार्यामुळं तयार झालेला हा भूआकार म्हणावा लागेल. भूगर्भतज्ज्ञाच्या मते दगडातून झिरपलेले ‘कॅल्शियम काबरेनेटयुक्त’ क्षार विरघळतात आणि ते तळाशी खडकांच्या पृष्ठभागावर जमा होतात. त्यांच्या संचयन क्रियेतून स्तंभासारखे आकार बनू लागतात. जाणकारांच्या मते, अशी भूरूप वैशिष्टय़े ग्रेट ब्रिटन, युगोस्लोव्हाकिया, अंदमान बेटांवर आणि भारतात उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आहेत. अरूण घोलप