गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

देवराया Devraya

devrai_देवराई
देवराई परंपरेची पार्श्वभूमी :

सह्याद्रीच्या मुख्य पर्वत रांगामध्ये उत्तरेला भीमाशंकर व कळसुबाई-हरिश्चंद्रगड हा टाप येतो. आदिवासी महादेव कोळी, ठाकर व इतर वन निवासी समुदाय या परिसरात पिढ्यानं पिढ्या राहत आहेत. येथील निसर्गाशी, झाडा-झुडूपांशी, गिरी-विहारांशी, मातीशी, वन्य-जीवांशी व त्यांनी विकसित केलेल्या कुणबाऊ जीवनशैलीशी त्यांचे एक जैव-सांस्कृतिक स्वरूपाचे घट्ट नाते जुळलेले आहेत. डोंगरदऱ्या व जंगलाशिवाय ते राहूच शकत नाही. सभोवतालच्या निसर्गाला व कर्तृत्ववान वंशजाला देव मानायचे, वाघ्या व वरसुबाईला पुजायचे, देवत्व बहाल करायचे, बाल-गोपाळांचे व गुराढोरांचे रक्षण करणारा क्षेत्रपाल म्हणून वनदेव व बहिरी यांच्या भरवश्यावर जगायचे. पांढरीचे म्हणजे गावाचे देव म्हणून त्यांना मान्यता द्यायची. अशा देव-देवतांचे मंदिरे म्हणजे घनदाट जंगल व त्यांच्या नावाने राखलेले जंगल म्हणजेच देवराई. अशी ही समृद्ध परंपरा आजही छोट्यामोठ्या स्वरुपात गावोगाव पाहायला मिळते. तेथील काडीला पण हात लावायचा नाही, अशा सार्वत्रिक बंधनातून व स्थानिकांनी विकसित केलेल्या पारंपारिक नीति-नियमांच्या आधारे त्यांचे व्यवस्थापन होते. भीमाशंकर ते कळसुबाई या परिसरातील पन्नास गावात किमान नव्वद पेक्षा अधिक देवराया आढळतात. महाराष्ट्रातील देवरायांची संख्या साडेतीन हजाराहून अधिक आहे. अभ्यासकांच्या मते, पश्चिम घाटातील (गुजरात ते तामिळनाडू) सात टक्के जंगल केवळ देवराई परंपरेमुळेच टिकून राहिले आहे.

जैवविविधतेची खाण :

महाराष्ट्रातील बहुतांशी देवराया ह्या निमसदाहरित व आर्द्रपानझडी या जंगल प्रकारात मोडतात. देवरायांची एक परिसंस्था असते. नानविध वनस्पती, पशु, पक्षी, जीवजंतू आदींचे एक सहजीवन येथे आढळते. गारंबी सारखे प्रचंड वेळ, लोधासारखे भव्य वृक्ष, प्रचंड आकाराचे आंबे, जांभूळ असे महाकाय वृक्ष फक्त देवरायामध्येच आढळतात. अगदी सह्याद्रीच आढळणारे सेरोपजिया, वीस एक प्रकारचे ऑर्किड्स या ठिकाणी पहावयास मिळतात. एका सादड्याच्या झाडावर तब्बल पाच प्रकारचे ऑर्किड्स म्हणजे यक्षफुले पाहण्याचे भाग्य देवरायामुळेच शक्य होते. कर्नाटक-तामिळनाडूमध्ये आढळणारे राळधूपाचे झाड उत्तर सह्याद्रीत फक्त भोर महाड रस्त्यावरील वरंध घाटाजवळील एका राईमध्ये मिळते. हिरडा, बेहडा, सातवीन, फणसाडा, वावळ, चारोळी, डोंगरी मोह, पायर, काटेसावर, भेरली माड, कुंभा, देवसावर, शिवन, वरस इ. वनस्पती देवरायामध्ये आढळतात. दुसऱ्या फळीतील वृक्षामध्ये पळस, पांगारा, बहावा, आपटा, बिब्बा, कोशिंब, गेळा, करमळ आदी. लहान वृक्ष पहावयास मिळतात. महावेलामध्ये पळसवेल, कांचनवेल, गारंबी, सोनजाई, पिळूक, महागुळवेल, मडवेल, शिकेकाई, करवंदवेल अशा अठराभार वनस्पतींनी देवराया नटलेल्या असतात. असंख्य झुडुपे त्यात माकडलिंबू, काळा व पांढरा कुडा, रामेठा, पांगळी, डिंगळी, कारवी, वायटी तर औषधी वनस्पती वेखंड, बोक, दातरंग, कडूकवठ, अनंतमूळ, लोखंडी, टेटू, याही देवरायामध्ये विपुल प्रमाणात असतात.

वन्यजीवांचे अगणित प्रकार हे देवरायांचे आणखी एक विशेष. वाघ, बिबटे तर आहेच. पण पूर्वी देवराईत वर्षातून एकदा दोनदा रानगवे यायचे, त्यांच्या शेणाने राईतील तांदळ्या भोवतीची जमीन पुजारी सारवत असे. तरस, नीलगाई, सांबर, भेकर, चौशिंगा, साळींदर अशी मोठी यादी होईल. शेकरू तर देवराईतील उंच झाडावर घर करूनच राहते. पक्ष्यामध्ये शृंगीघुबड, रानहोले, हळद्या, बुलबुल, मलबारी धनेश, जंगली मैना, पांढऱ्या पोटाचा पहाडी कोतवाल, भांगराज, स्वर्गीय नर्तक (बाणपाखरू), कस्तूर, अशी असंख्य पक्ष्यांची शिरगणती होईल.

साप, सरडे, पाली, सापसुरळ्या यांची तर राईत रेलचेल असते. नाग, फुरसे, घोणस, मण्यार, हरणटोळ, धामण, गवत्या, खापरखवले, रुका, तस्कर अशी विविधता बनात असते. विणीच्या हंगामात किमान दहा-बारा प्रकारचे बेडूक तसेच देवखेकड येथे आढळतील. माश्यांचे लहान मोठे प्रकार व कोळी, कीटक यासारखे संधिपाद वर्गातील प्राणी येथे बघावयास मिळतात. अशा या देवराया निसर्गातील जनुकपेढी म्हणजे जीन बँका आहेत.

राई व बन :

उत्तर सह्याद्रीतील देवरायांची परंपरा खूप प्राचीन असणार. बाला घाटातून स्थलांतरित झालेल्या महादेव कोळी समाजाने ही परंपरा या परिसरात रुजवली. त्याला किमान सातशे वर्ष झाली असणार. त्यापूर्वीची पवित्र वनाची संस्कृती या भागात असणार. वनदेव, वाघोबा, मारुती, काळोबा, बहिरी, सिदोबा, वरसुबाई, सतुबाई, दर्याबाई इ. ग्रामदेव व देवता यांच्या नावाने पवित्र जंगल राखण्याची रूढी पुढील पिढ्यांनी पाळलेली आहे. यातील गमतीचा भाग म्हणा किंवा योगायोग. स्थानिक लोक देवीच्या नावाने राखलेल्या जंगलाला ‘राई’ असे स्री-वाचक संबोधतात, तर देवाच्या नावाने जपलेल्या जंगलास ‘बन’ असे पुरुषवाचक नाव दिले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, ते काळोबाचे बन व ती वरसुबाईची राई. प्राचीन अशा पवित्र जंगलातसुद्धा पुरुष व स्री लिंगी असे भेद असू शकतात, हे ऐकून मनोरंजन होते. प्रत्येकाने एक तरी राई अनुभवली पाहिजे, अगदी शांत चित्ताने तिचे रसग्रहण करायला हवे.

 प्राचीन परंपरांपैकी ग्रीक आणि रोमन संस्कृतीत देवराईचे उल्लेख आढळतात. ओक वृक्षांची देवराई “डोडोना” आणि अथेन्स शहराबाहेरील ऑलिव्ह वृक्षांची संरक्षित भूमी “The Groves of academe” या नावांनी प्रसिद्ध आहे.रोममधील “Roman Forum” आणि इटलीमधील “Bosco Sacro” या देवराया प्रसिद्ध आहेत.नायजेरिया या आणखी एका आफिकन देशात UNESCO World Heritage म्हणून प्रसिद्ध असलेली “Osun-Osogbo” नावाची देव राई आहे.

गाईड संपर्क:8390-607-203 /9881890533

Devarai

Background of the Devarai tradition:

Bhimashankar and Kalsubai-Harishchandragad are located to the north in Sahyadri’s main mountain range. Adivasi Mahadev Koli, Thakar and other forest resident communities have been living in this area for generations. Here they are closely linked with nature, shrubs, lizards, clays, wildlife and the life style they have developed. Without hills and forests, it cannot survive. The surrounding nature and the offspring believed in God, worshiped the tigers and the Varsubai, presided over the deities, guarded the flocks and herdsmen and depended on the deities of the forest and deaf. They were to be recognized as the Gods of the whites. The temples of such deities are the dense jungle and the forest maintained by their name means Devarai. This rich tradition is still seen in small and small villages. They are managed by the universal bond and traditional policies developed by the locals, but they do not have to be touched. Fifty villages in the area of ​​Bhimashankar to Kalsubai are found in at least ninety-nine devarayas. The number of Devarai in Maharashtra is more than three and a half thousand. According to the researchers, seven percent of the forest in the Western Ghats (Gujarat to Tamil Nadu) survives only because of the Devarai tradition.

Biodiversity mining: Most of Deoraya in Maharashtra are submerged in semi-forest and humid forest. Devaraya has a system. A symbiosis of a variety of plants, animals, birds, animals, etc. is found here. Great times like Garambi, magnificent trees like Lodha, huge mangoes, Jambul, are found only in Devaraya. Twenty-one orchids can be found in the cerapogia, which is very rare. There are only five types of orchids on a mattress, which is possible because of Devaraya’s fate for seeing the flowers. The coconut tree found in Karnataka-Tamil Nadu is found in a rye near the upper ghats on Bhor Mahad just north of Sahyadri. Hirda, Behda, Seventh, Phansada, Vaval, Charoli, Dongri Moh, Paire, Katasevar, Bherali Mud, Kumbha, Devasvar, Sivan, Varus etc. The plants are found in Devaraya. The second plank tree includes Palas, Pangaras, Bahava, Apata, Bibba, Salat, Galea, Karam, etc. Small trees can be seen. In the Mahavela, Devaraya is nailed by eighteen plants like Palaswell, Kanchanwell, Garambi, Sonjai, Pillook, Mahagulwell, Madwell, Shikakei, Karawandwell. Numerous shrubs are abundant in Makkalimbu, Black and White Cuda, Rametha, Pangli, Dingali, Karvi, Yt and herbs, Bok, Datang, Bitterwood, Infinite, Iron, Tattoos, Devaraya.

Another unique feature of Devaraya is the countless varieties of wildlife. The tiger, though, is there. But in the past, Deorai used to come to Ranagavi twice a year, with his dung shifting the land around the Rai rice. Tara, Nilgai, Sambar, Bhekar, Choussingh, Salinder will be on the big list. The Shekaru lives in a house on a tall tree in Deorai. The birds will be counted as horns, horns, turmeric, bulbs, malabari dhanes, wild maina, white stomachs, kotwal, bhangraj, heavenly dancer, archer, musk.

There are snakes, sardines, lizards, snakes, and rails. It produces varieties like nag, furs, ghanas, manar, haranotol, dhaman, grasses, khaparkhale, rukka, smuggler. At least ten to twelve types of frogs, as well as Devkhekad, will be found during the weevil season. Small species of fish and arthritis, such as spiders and insects, are found here. The genes of this devaraya nature are the gene banks.

Rai and Bun: The tradition of Devarai in the North Sahyadri will be very ancient. Mahadev Koli community who migrated from Bala Ghat introduced this tradition in this area. It must have been at least seven hundred years. The ancient sacred forest culture will be in this area. Forest, Waghoba, Maruti, Kaloba, Bahri, Sidoba, Varsubai, Satubai, Daryabai etc. The tradition of maintaining the sacred forest in the name of Gram Dev and deity has been followed by the generations. Call it part of the fun or coincidence. The locals refer to the forest as ‘Rai’ in the forest preserved in the name of the goddess, while the forest preserved by the name of God is named as ‘Ban’. For example, it should be black and it is a mustard seed. It is interesting to hear that even in ancient sacred forests, there can be differences between men and women. Everyone should experience rye, and it should be consumed with a very calm mind.

information: vijay sambare

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *