पांढऱ्या पाठीचे गिधाड Indian Scavenger Vulture
एक सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि याच दिवशी योगा योगाने आम्हाला सांदणव्हली साम्रद ,अकोले येथे भटकंती करताना ते एका खडकावर दिसले. आमच्या सोबत असलेले आमचे मित्र रघुनाथ बोऱ्हाडे यांनी ते पांढऱ्या पाठीचेच आहे अस ओळखले जवळ जाताच ते काही क्षणातच उडून गेले दिसेनासे झाले कळसूबाई हरिचंद्र अभयारण्यात हा ही एक पक्षी खूप दिवसांतून आम्हाला पहायला भेटले ते ही पांढऱ्या पाठीचे खरे तर आता वेदनाशामक औषधींचा मारा गिधाडांच्या जीवावर बेतलेला दिसतो आता मात्र तज्ञांच्या मते पर्यावरण रक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय उपखंडातील नऊ प्रजातींपैकी तीन प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी पांढऱ्या पाठीचे गिधाड, लांब चोचीचे गिधाड आणि पातळ चोचीचे गिधाड या तीन प्रजाती ९९ टक्के नष्ट झाल्या आहेत. मात्र, त्याचबरोबर आता इजिप्शियन गिधाड आणि राजा गिधाड (रेड हेडेड व्हल्चर) या दोन प्रजातीसुद्धा अनुक्रमे ८० व ९१ टक्के नष्ट झाल्याचे एका संशोधन अहवालातून समोर आले आहे.
हा पक्षी जर नामशेष झाला तर तो बघायला फक्त फोटोतच दिसेल..
गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992