गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

फोफसंडी Fofsandi

fopsandi
अकोल्यापासून चे अंतर : अकोलेपासून पासून अंतर ४० किलोमीटर आहे.
 सह्याद्री पर्वताच्या कुशीत मांडवी नदीच्या तीरावर कुंजीरगडाच्या पायथ्याशी हे एक निसर्ग नवल गाव या गावाचा इतिहास म्हणजे, स्वातंत्र्यपूर्व काळात पॉप नावाचा ब्रिटीश अधिकारी या ठिकाणी रविवारी (संडे) ला यायचा त्यामुळे ह्या ठिकाणचे नाव ‘पॉपसंडे’ असे पडले पण कालांतराने ह्या नावाचा अपभ्रंश होऊन ‘फोफसंडी’ हे नाव पडले. ब्रिटीश काळातील पॉप ह्या अधिकाऱ्याचे ‘रेस्ट हाउस’ आजही आपल्याला पहायला मिळतो. तसेच गावच्या वायव्य दिशेस कुंजीरगड (कोंबडकिल्ला) आहे. व मांडवी नदीचे उगमस्थान ह्या गावच्या हद्दीत असून तेथे दर्याबाईचे मंदिर आहे.पूर्वीच्या काळी “मांडव्यगण” ऋषीने येथे तपश्चर्या केली होती. म्हणून ह्या नदीचे नाव मांडवी पडले ऋषींच्या तपाची गुहा आजही आपल्याला पहावयास मिळते. ऋषींनी गावातील पश्चिममुखी हनुमानाची प्रतिष्ठापना केलेली आहे. व खिंडीत कोतूळ रस्त्याच्या कडेलाच भव्य गुहा असून आजही ती वापरात आहे. हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीनचार तास उशिरा होतो आणिसूर्यास्त तीनचार तास लवकर होतो.थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहाआठ तासांचा असतो.अकोले तालुक्यातून कोतुळ, पळसुंदे (भरोबा)मार्गे अबीटखिंडीतूनएकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोफसंडी गावात पोहोचता येते.

 गाईड संपर्क:8390-607-203

Fofsandi

 

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *