गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

बारव Barav

Barav
अकोल्यापासून चे अंतर : वाशरे 7.5 km , कुभेफळ 7.5  km  औरंगपूर फाटा  4.3 km
 नैसर्गिक जलस्रोतांचा अभ्यास करून महाराष्ट्र परिसरात अनेक ठिकाणी भक्कम अशा दगडी बारव बांधण्यात आल्या.  अतिशय सुंदर कोरीव बांधकाम ह्या वेळी कारागीरांनी केलेले दिसते.  या सर्व बारव होळकरांच्या काळातील  दगडी बांधकाम असलेल्या या विस्तीर्ण बारवा आजही या परिसरातील नागरिकांची तहान भागविण्याचे काम करतात.
सुलभा मुरलीधर सांगतात की, त्या काळातील बांधकामाचे तंत्रज्ञान निश्चितच आपल्यापेक्षा प्रगत होते. बारवाची संपूर्ण बांधणी दगडांनी केली जायची. आजही त्यातील एकही दगड पडलेला दिसत नाही. त्या वेळी याचा उपयोग पिण्यासाठी, शेतीसाठी,वापरासाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात करत असत. बारवांच्या बाजूला आजही येथे महादेवांची मंदिरे आढळतात, जेणेकरून पाणी शुद्ध राहणे, तसेच विविध धार्मिक विधी करण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. त्या काळातील बारव बांधणाऱ्यांना पाण्याचे स्रोत कुठे आहेत याची माहिती होती. तसेच जलपुनर्भरणाचे महत्त्वदेखील त्यांना माहिती होते. या बारवांविषयीचे पुरावे अजूनही इंदौरच्या होळकर दरबारात आपणास बघावयास मिळतात, असेही त्या शेवटी म्हणतात.  अकोले तालुक्यातील वाशरे गावात, कुभेफळ गावात तसेच औरंगपूर फाटा जवळ बाराव आहेत. वाशेरे गावातील बाराव आजही गावकऱ्यांची तहान भागवते. कुभेफळ गावालगत असलेली बाराव मात्र अतिशय सुंदर बांधकाम केलेली दिसते परंतु गावाच्या व मनुष्य वस्तीच्या बाजुला असल्याने  जास्त वापर नसल्यानी थोडी दूर्लक्षित आहे. औरंगपूर फाटा जवळ बाराव पूर्णपणे गाडलेली होती परंतु येथील स्थानिकांनी उत्खनन करून  जिर्णोद्धार  केला व गाडली गेलेली गणेशाची मूर्ती  तसेच शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली.
खरे तर अकोले तालुकाला  ऐतिहासिकता प्राप्त आहे  अनेक ऐतिहासिक खुणा-वीरगळ मिळतात. ते सर्व एकत्र करायला हवे, वेगवेगळ्या दूर्लक्षित वस्तूंची पुन:रचना करून  त्यांचा वेगळेपणा सांभाळायला हव्यात.  खर्च आपण सगळ्यांनी आत्मीयतेने विचार करायला हवा. विकास म्हणजे जुने मोडून नवे घडवणे नसून, जुने सांभाळत नवीन रचणे होय!
मग केव्हा येताय…
 गाईड संपर्क:8390-607-203

Barav

Distance from Acoli: Washere 7.5 km, Kumbhefal7.5 km Aurangpur Fort 4.3 km

Studying the natural water resources, strong stones were constructed in many places in Maharashtra area. Pretty carved construction looks like craftsmanship at this time. All of these twelve bars, which are of stone construction during the Holkar period, still serve as a thirst for the citizens of this area.

Sulabha Muralidhar says that the technology of construction was certainly more advanced than we were at that time. The twelfth was to be constructed of stone. Even today, none of the stones seem to have fallen. At that time, citizens used it extensively for drinking, agriculture, and consumption. The temples of Mahadeva are still found here beside the Twelve, so that the water can be used for purification, as well as for various religious rituals. The Twelve Builders of those days knew where the water sources were. They also knew the importance of water supply. He also says that the evidence about these twins is still visible in the Holkar Durbar of Indore. There are bars in Washere village of Akole taluka, Kumbhefalv illage and near Aurangpur Fata. Barav of Washere village still thirst for villagers today. The Barav near Kubhafal village seems to be a very fine construction but it is a little overlooked as there is not much use as it is on the side of the village and the human habitation. The Barav was completely buried near the Aurangpur Fata but locals excavated it and renovated it and buried the idol of Ganesh and Shivlinga buried there.

In fact, Akole taluka has historicity and many historical landmarks are found. All of them must be combined, different types of neglected objects must be redesigned and maintained separately. All of us should think intimately. Development is not just breaking the old, making the new, replacing the old!

Then when are you coming…

Contact: 8390607203

You may also like...

1 Response

  1. rahul pandurang waware says:

    हि बारव कोणत्या गावातील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *