गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

बितनगड बिताका bitangad

bitangad
अकोल्यापासून चे अंतर : व्हाया पिंपळगाव नाकविंदा 47.8km, व्हाया शेरणखेल 51.5 km ,व्हाया समशेरपूर 51.2 km.
 किल्ले बितनगड
बितनगड किल्ल्याचे राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) हुन छायाचित्र. बितनगड किल्ला हा सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील एक किल्ला आहे. तो राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) च्या पुर्वेला आहे. या किल्ल्याला बिताका ही म्हणतात. तो कळसुबाई व पट्टागड यांच्यामध्ये आहे.

पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याचा माथा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्यावर एक गुहा आणि एक पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. काही उध्वस्त वास्तु आहेत. किल्ल्यावरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर, डोंगररांगा मनाला भुरळ घालतात.
पोहोचण्याच्या वाटा :
घोटी – भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे. या गावातून एकदरा फाटा अंदाजे १२ किमी अंतरावर आहे. एकदरा फाट्यापासून बितनगडाच्या पायथ्याचे बितनवाडी गाव ६ किमीवर आहे. गडाच्या पायथ्याशी बितंगवाडी हे गाव आहे. या गावातून किल्ल्याकडे जाता येत. शेतातून वाट काढत आपण किल्ला चढायला सुरुवात करतो. किल्ला चढायला कठीण नाही, पण खडकात खोदलेल्या पायरी चढताना नीट चढून जाण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दोरी (रोप) असू द्यावी. पावसाळ्यात शेवाळ्यामुळे पायरी निसरड्या होऊ शकतात. नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.
राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.बितंगवाडीत राहता येतं. टाकेद (बितंगवाडी पासून सुमारे १५ किलोमीटर) या गावातील जटायूच्या देवळात राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ : बितंगवाडीतून १ तास लागतो.
उत्तम कालावधी :  नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.

गाईड व राहण्याच्या सोयीसाठी संपर्क  : 8390-607-203 

 

Distance from Akole: Via Pimpalgaon Nakavinda 47.8km, Via Sherankhel 51.5 km, Via Samarsharpur 51.2 km.

Fort Bitangad

Photo of State Highway 44 (Maharashtra) Hoon photo of Bitangad Fort. Bitangad Fort is a fort in the Kalsubai range of Sahyadri It is on the east side of State Highway 44 (Maharashtra). This fort is called Ghazaka. It lies between Kalsubai and Pattagad.

Places to visit:

The fort’s head is small. This fort should be used for surveillance. The fort has a cave and a drinking water tank. There are some ruined buildings. The surroundings, which are visible from the castle, are filled with mountains.

Outreach:

Ghatti – Bhandardara road is a fork in the village of Takeda. It is approximately 12 km away from this village. Bittanwadi village at the foot of Bitangada is at a distance of 6 km from the other side. Bitangwadi is the village at the foot of the fort. From this village we used to go to the fort. Leaving the field, we begin to climb the fort. The castle is not difficult to climb, but as a precautionary measure, the rope should be used as a precautionary measure when climbing steep steps. In the rainy season, the moss can be slippery. November to February is the best time to visit the fort.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *