गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

मुळा नदी (अहमदनगर ) Mula River

Mula River
अकोल्यापासून चे अंतर :

मुळा नदीचा उगम आजोबा डोंगरावर झाला. लांबी १५५ कि.मी. प्रवरा या नदीस मिळते, पाणलोट क्षेत्र २२७५.८६ किमी² धरण ज्ञानेश्वरसागर

मुळा नदी सह्याद्री पर्वताच्या आजोबा डोंगराजवळ उगम पावते. उगमापासून १३६ किलोमीटर वाहत आल्यावर बारागाव(नांदूर) (तालुका राहुरी) परिसरात तिला अडवून तिच्यावर धरण बांधण्यात आले आहे. इसवी सन १९५८ ते १९७२ दरम्यान बांधण्यात आलेले हे मातीचे धरण जिल्ह्यातील सर्वांत मोठे म्हणजे २६ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहे. धरणाचा पाया खोदताना काही भागात वाळू, काही भागात चिकणमाती, गेरू व कारा दगडाचे थर सापडले. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या. देशात पहिल्यांदा जलविरोधी काँक्रीटचा पडदा या धरणाच्या पायात बांधून त्याला मजबुती देण्यात आली. धरणाच्या भिंतीची लांबी २८५६ मीटर, तर उंची ४८.१७ मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र २३४८ चौरस किलोमीटर आहे. पाण्याखाली १३ हजार २०० एकर जमीन गेली आहे.

धरणाला डावा व उजवा असे दोन कालवे असून त्यातून राहुरी, नेवासे, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतीला पाणी पुरवले जाते. धरणाच्या भिंतीलगत पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह असून तेथून जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते. या जलाशयाला ‘ज्ञानेश्वर सागर’ असे नाव देण्यात आले आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात मच्छीमारी चालते. नौकानयनासाठी हे उत्तम स्थान आहे. नगरपासून सुमारे ३५-४० किलोमीटर अंतरावर असलेले हे मुळा धरण पाहण्यासारखे आहे.

पुढे मुळा नदी ही राहुरी शहरामधून पुढे जाऊन नेवासे गावाजवळ प्रवरा नदीला मिळते. प्रवरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे.

विशेष : पुणे जिल्ह्यातली मुळा नदी वेगळी आहे.

गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *