गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

लिंगेश्वर लिंगदेव Lingeshwar Lingdeo

अकोल्यापासून चे अंतर :

सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले व उंच उंच पर्वत रागांच्या सानिध्यात असलेले परंतु पवित्र अशा मुळा नदीच्या तीरावर वसलेले अतिशय निसर्गरम्य परिसरात लाभलेले म्हणजे श्री.लिंगेश्वर महादेव देवस्थान मंदिर होय. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे येथे दररोज शेकडो व वर्षभर हजारो यात्रेकरू येत असतात.
भरपूर पाणी, मोकळी प्रशस्त जागा स्वच्छ व आरोग्यदायक हवा असल्याने पर्यटन क्षेत्री यात्रेकरू खूप आनंदी व समाधानी असतात श्री भगवान लिंगेश्वर महादेव हे स्वयंभू व अपरिमित असे जागृत व जाज्वल्य देवस्थान आहे. सर्वच यात्रेकारूंना याचा अनेक वर्षापासुन अनुभव आलेला आहे. श्री लिंगेश्वारास सोडलेले संकल्प पुर्णत्वास गेल्याची इतिहास काळापासुन अनेकांना खात्री पटली आहे.शहाजीराजे यांचेश्रद्धास्थान मुळ स्वयंभू असलेले भगवान श्री.लिंगेश्वर महादेव हे मराठ्यांचे इतिहासन काळापासूनचे श्रद्धास्थान आहे. शहाजीराजांनी अनेकदा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला.परंतु तोयशस्वी झाला नाही. स्वराज्य स्थापनेचा हा संकल्प शहाजीराजांनी प्रथम श्री.लिंगेश्वर महादेव मंदिरातच केला.या प्रयत्नास जरी यश आले नाही तरी छत्रपती शिवाजी महाराजांना या प्रयत्नातून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मात्र मिळाली शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या कार्यात यशस्वी झाले.

गाईड संपर्क : 8390-607-203/ 9665-745-992

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *