गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

सह्याद्री Sahyadri Mountain

Shayadri
अकोल्यापासून चे अंतर :

सह्याद्रीत वसलेले हे गड-कोट किल्ले…त्यांचा इतिहास, तो निसर्ग, डोंगर दऱ्या, नदी…ओढे, पक्षी पाखरे…विविध रंगी फुले….झाडे वेली…ती माती…तो तिथला दरवळीत सुगंध…तो आनंद मनाला पार भुलवून टाकतो….सह्याद्रीचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. त्याच्या अथांग रूपापुढे आपण नेहमीच खुजे वाटत असतो. इथे घडलेल्या इतिहासाने सह्याद्रीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. सह्याद्रीत उभे ठाकलेले गडकिल्ले आपल्याला इथल्या इतिहासाची भव्यता, कल्पकता, सुंदरता यांची प्रचिती देत आजही अगदी भक्कमपणे उभे आहेत. जवळ-जवळ ५०० वर्षे किंवा अधिक काळापासून हे सर्व किल्ले,मंदिरे आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत.
सह्याद्रीला आपापल्या परीने समजुन घेण्यातच खरी मजा आहे, सह्याद्रितील चढ़-उतार आयुष्याच्या नव्या व्याख्या शिकवतात.इथला निसर्ग जगणे शिकवतो. इथले नदी नाले निरंतर आणि संकट काळातुन वाहण्याचा संदेश देतात. इथला रानवारा मनाला सुखावून जातो. इथे प्राणी-पक्षी-वन्यजीव नवनव्या संकल्पनेतुन धैर्य आणि वेळ प्रसंगी शांततेचे रूप घडवतात. खरच हा बेलाग आणि अफाट सहयगिरी मनमोहक आणि कधी कधी रौद्र भासवुन विविधतेच दर्शन घडवतो.

असा हा ”सह्याद्री” आणि मनाला भुलवणारा, अद्भुत हवा हवासा वाटणारा ”निसर्ग”…सगळ्यांना वेड लावणारा सह्याद्री..

Sahyadri,

Located in the Sahyadri, these fortresses – their history, its nature, the mountains, the river, the river, the birds, the birds … the different colors of flowers … the tree valley … the soil … There is little to do. We are always happy to look up to his impatient nature. The history that has taken place here has given Sahyadri an extraordinary importance. Gadkils, standing in the midst of Sahyadri, stand firm even today, giving us a glimpse of the magnificence, ingenuity and beauty of its history. All these forts and temples have been witnessing their glorious history for almost 3 years or more.

It is a real pleasure to understand the Sahyadri with its own fairness, the ups and downs of the Sahyadri teach new definitions of life. It teaches nature to live. The rivers here convey the message of continuous and perilous flow. The wilderness here is soothing to the mind. Here the animals and the wildlife create a new concept of patience and peace of time. Indeed, this unmatched and immensely collaborative approach is fascinating and sometimes ruddy.

Such is the “Sahyadri” and the mind-blowing, wonderful air of “Nature” … madam Sahyadri ..

 

 

गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *