गाईड संपर्क: 8390-607-203 / 9665-745-992

सांदनदरी, साम्रद Sandhan Valley

sandhanvally
अकोल्यापासून चे अंतर :
60km

सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी…..

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत.त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा.दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो.हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते.तिथेपोचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठानेसाम्रद या गावी जावे लागते. पुण्यावरुन पोचण्यासाठी आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी (भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. मुंबईकरांसाठीकल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे शेंडीला पोचता येते. नाशिकहूनहीघोटीमार्गे पोचता येईल. मुखाजवळच उजव्या हाताला पाणवठा आहे. नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी. माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केलेली दिसते.अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा आहे. त्याच घळीतून खाली उतरत अगदी शेवटच्या मुखाशी जाता येते। अंदाजे घळीची लांबी एक किलोमीटर आहे। त्यानंतर समोर जो काही विराट कोकणकड्याचा भाग दिसतो त्यासमोर आपले आयुष्यच एकदम क:पदार्थ आहे असे वाटू लागते। एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप आणि समोर करुळ घाटाचा कडा आहे सांधण घळीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच दोराच्या आधाराने पार कराव्यात.मुक्कामाची आणि जेवणाची सोय साम्रद गावात होऊ शकते

गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992

You may also like...

1 Response

  1. Ashok rahinj Alephata says:

    good informaction

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *