गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

रानफुलांचा पुष्पोत्सव,रानफुले, कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड,

sonki
अकोल्यापासून चे अंतर :
 रानफुलांचा पुष्पोत्सव…
सह्याद्रीच्या कुशीत बहरलाय तो रानफुलांचा पुष्पोत्सव. अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कळसुबाई – हरिश्चंद्रगडाच्या या परिसराला रंगीबेरंगी फुलांच्या अलंकारांनी निराळीच झळाळी आली आहे. हिमालयाच्या खालोखाल देशभरात सह्यपर्वताची ख्याती आहे  . येथील रानसम्राज्ञीने हिरवा शालू परिधान केला आहे. जागोजागी अजूनही निर्झराचं मंजुळ गाणं ऐकू येत आहे. फुलांचा बहर रंगीबेरंगी फुलपाखरांना निमंत्रण देतो आहे. रुंजी घालणा-या मधमाश्या फुलांना बिलगताहेत…. निसर्गाने गंधर्व – किन्नरांची मैफल भरविल्यासारखे वाटते आहे. त्यात नटखट उनाड वा-यावर डोलणारी अगणित फुले जणू भोवतीने फेर धरून नाचत रानप-यांच्या नृत्यांच्या आविष्काराचा भास घडवत आहेत. या सभेतील फुलांचे नानाविशेष, रंग, गंध, निळाई, हिरवाई या नाट्याची भैरवी आता सुरू झाली आहे. हा रंगविलास पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. मान्सूनच्या आगमनाबरोबरच तशी पुष्पोत्सवाची सुरुवात होते. फुलाची ही दुनियाच अदभूत आहे सह्याद्रीच्या पठारावर शे-पाचशेहून अधिक जातीचे रानफुले आढळतात पण विशेष करून सोनकीच्या इटुकल्या-पिटुकल्या फुलांच्या फुललेल्या पुष्पमळ्यांनी पर्वतपठारे पीतवर्णी दिसताहेत. सोनकीची फुले जास्तीतजास्त प्रमाणात  दिसतात.  मुळातच हरिश्चंद्रगडाचा हा परिसर म्हणजे सृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्नच जणू! शेकडो प्रकारच्या वृक्ष-लतांची साथसोबत या भागाला लाभली आहे.  युगानुयुगांची.
तर मग येणार ना एकदा धरतीमातेचा साज शृंगार बघायला….
गाईड संपर्क:8390-607-203

Flower Festival…

It is a beautiful floral festival of flowers. Kalsubai – Harishchandragad This area is blessed with colorful floral ornaments that have been blessed with the beauty of nature. Beneath the Himalayas, the country has a reputation for tolerance. The ranchman here is wearing a green shawl. You can still hear the melody of Najjira. The flower blossom invites colorful butterflies. Beekeepers are scenting flowers…. Nature seems to have provided a concert of Gandharva – shemales. There are countless flowers floating around in the dense wilderness, pretending to invent dance dances. The variety of flowers, colors, smells, sapphires, blue and green in the meeting has now begun. We are enamored with this color scheme. With the arrival of the monsoon, the festival begins. More than five hundred species of flowers are found on the Sahyadri plateau, but especially in the blooming flowers of Sonki’s blooming flowers, the mountains appear yellow. Sonic’s flowers are most visible. Basically this place of Harishchandragad is a beautiful dream of creation! Hundreds of different types of tree trunks benefit from this area. Of ages.

Then you will not come once to see the decoration of the Mother Earth….

Contact: 8390607203

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *